गोकुळ दूध संघाची कोरमअभावी तहकूब झालेली अध्यक्षपदाच्या निवडसभेची कोंडी पंधरा दिवसांनी फुटली. महायुतीने अखेर अध्यक्षपदावर दावा सांगून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील (Gokul Chairman Rajesh Patil) यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आज (10 नोव्हेंबर) सभा पार पडली. यामध्ये गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर, तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यात लढत झाली. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या या लढतीत राजेश पाटील यांचा विजय झाला. (Rajesh Patil New Chairman Of Gokul Kolhapur) गोकुळच्या निवडून आलेल्या 25 संचालकांनी आणि शासननियुक्त 4 संचालकांनी या मतदानप्रक्रियेत भाग घेतला. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 13 विरुद्ध 16 असा महायुतीचा विजय झाला. म्हणजेच शासननियुक्त चारही संचालकांनी महायुतीच्या पारड्यात मतं टाकली.
गोकुळ दूध महासंघासाठी 18 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. तर 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. यामध्ये एकूण 25 जागांपैकी सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा, तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या. याच समविचारी आघाडीच्या 13 आणि महायुतीच्या 12 संचालकांनी मतदान केले. तसेच शासन नियुक्त चार सदस्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यानंतर राजेश पाटील यांचा विजय झाला. मात्र अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक कोरम दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यासह त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुतीनं घेतला. महायुतीचा शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी कोर्टाचे दार ठोठावले. परंतु 10 नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधिन ठेवून घेण्यास सांगितले. त्यानंतर आज गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा विजय झाला. (Gokul Chairman Election 2026 Hasan Mushrif vs Satej Patil)
कोण आहेत राजेश पाटील? (Who is Rajesh Patil)
राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजप बंडखोर शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे सुद्धा आमदार होते.
अजित पवारांचा 'राईट हँड' म्हणून राजेश पाटील यांची होती ओळख- (Ajit Pawar And Rajesh Patil)
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर अजित पवार यांच्या एका भाषणाची चर्चा सुरु आहे. चंदगडकरांनी, आजराकरांनी, गडहिंग्लजकरांनी माझा अत्यंत प्रेमाने आपुलकीने नागरी सत्कार केलेला तुम्ही माझा नागरी सत्कार केल्यानंतर मी पुन्हा राज्याचा उपमुख्यमंत्री झालो. त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल तुम्ही पुन्हा सत्कार केलेला होता. त्या सत्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि तो करत असताना मी फेटा फक्त बांधला नाही. कुठेतरी एक मन म्हणत होतं कुठे फेटा बांधतो, आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय, म्हणून तो फेटा बांधला नाही मी, फेटा बांधील पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या, एक काय म्हणेल तेवढे फेटे बांधेन. पण तेवढं तुमच्या हातात आहे, तेवढं तुम्ही त्या ठिकाणी करा अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. अधिक न बोलता चंदगडकर सत्कार मला नेहमीच पावतो याबाबत माझ्या मनामध्ये अजिबात दुमत असण्याचं कारण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांच्या राजकीय सामाजिक वारसा घेऊन आमचे राजेश पाटील सक्षमपणे पुढे चालवत आहेत, याचा मला आनंद आहे. पण आणि समाधान पण आहे पण दुःख आहे, ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. अख्ख्या कोल्हापूरमध्ये आमच्या महायुतीचे सगळे आमदार निवडून आले. एकटा आमच्या राजेश पाटलाला पराभूत केले. 'आमचा गड आला महाराष्ट्रात, पण आमचा सिंह गेला', अशी खंत अजित पवार यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
राजेश पाटील यांची कारकीर्द- (Rajesh Patil NCP Politics)
राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार आहेत
जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत, तोपर्यंत फेटा बांधणार नाही असा निर्धार त्यांनी केला होता
राजेश पाटील हे शिवेसनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणे आहेत.
चंदगड विधानसभा मतदारसंघातून 2019 साली राजेश पाटील हे आमदार झाले होते.
मागच्या गोकुळ निवडणुकी वेळी राजेश पाटील यांच्या पत्नी आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
2024 च्या निवडणुकीवेळी भाजप बंडखोर शिवाजी पाटील यांनी राजेश पाटील यांचा पराभव केला.
मागच्या वेळी गोकुळ निवडणुकीमध्ये झालेला पराभव मंडलिक आणि राजेश पाटील यांना जिव्हारी लागला होता.
यावरून हसन मुश्रीफ यांच्यावर मंडलिक गटाकडून टीकाही करण्यात आली होती.
दरम्यान हसन मुश्रीफ गटाकडूनच राजेश पाटील यांना गोकुळ अध्यक्ष पद मिळाल्याने जुना वाद निवडला आहे.
राजेश पाटील यांचे वडील ही चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले होते.
यामुळे राजेश पाटील यांना राजकीय पार्श्वभूमी लाभल्याने आज गोकुळअध्यक्षपद मिळाले आहे.
आज सकाळी 10 वाजल्यापासून काय काय घडलं? (Gokul Chairman Election 2026)
सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे 13 विजयी उमेदवार गोकुळमध्ये दाखल झाले.
महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे 12 उमेदवार गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पोहोचले.
शासननियुक्त 4 संचालक देखील गोकुळमध्ये दाखल झाले.
पहिले महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
समविचारी आघडिकडून शशिकांत पाटील चुयेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
साडेबाराच्या सुमाराला महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत महायुतीच्या सभेला सुरुवात झाली.
शासननियुक्त संचालकांच्या मतदानावर समविचारी आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला.
गोकुळ शिरगावच्या परिसरातच महायुतीच्या नेत्यांनी स्टेज उभारले
मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक यांसह महायुतीचे अनेक नेते स्टेजवर उपस्थित होते.
दुपारी 1.15 वाजता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदासाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली.
महायुतीच्या संचालकांनी मतदान केलं. त्यानंतर आता समविचारी आघाडी मतदान केलं.
दोन्ही बाजूचे मतदान झाल्यानंतर शासन नियुक्त संचालकांनी मतदान केलं.
दुपारी 1.50 वाजता गोकुळच्या अध्यक्षपदाचा निकाल हाती आला. राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली.
गोकुळ अध्यक्षनिवडीचा कार्यक्रम कसा झाला? (Gokul Chairman Election 2026)
स.11.15 ते 11.45- अर्ज वाटप व स्विकृती
स.11.50 ते दु.12.20- अर्जांची छाननी
दु.12.25- वैध अर्जाची यादी प्रसिद्ध
दु.12.25 ते 12.55- अर्ज माघारीची मुदत
दु.1.10 वा.- अंतिम उमेदवार यादी
दु.1.25 ते 1.55- मतदान
दु. 2 ते 2.30- मतमोजणी, निकाल जाहीर
निवडणुकीत समविचारी आघाडीला 25 पैकी 13 जागा तर महायुतीकडे 12 जागा- (Gokul President Election 2026)
गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून घमासान रंगलं आहे. निवडणुकीत समविचारी आघाडीला 25 पैकी 13 जागा तर महायुतीकडे 12 जागा आहेत. मात्र अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक कोरम दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यासह त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार (Gokul President Election 2026) देण्याचा निर्णय महायुतीनं घेतला. त्यामुळे सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीच्या तोंडचा अध्यक्षपदाचा घास हिरावण्याची वेळ आली.
गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी- Gokul Election Result 2026 Winner Candidate List)
सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे विजयी उमेदवार-
शशिकांत पाटील चुयेकर
बाबासाहेब श्रीपती चौगले
अभिजित प्रभाकर ताईशेटे
किसन बापू सो चौगले
राहुल बजरंग देसाई
बाबासाहेब विष्णू देवकर
विश्वजित दिनकरराव जाधव
विद्याधर बाबूराव गुरबे
अंजना केदारी रेडेकर
भाग्यश्री धीरज डोंगळे
शशिकांत शामराव खोत
राजुबाबा जयवंतराव आवळे
बयाजी देवू शेळके
महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी
राजेश नरसिंगराव पाटील
राहुल पी. एन. पाटील
रणजित के. पी. पाटील
रणजित दिलीप पाटील
अंबरिशसिंह संजय घाटगे
चेतन अरुण नरके
अजित शशिकांत नरके
अजित पांडुरंग पाटील
वीरेंद्र संजय मंडलिक
युवराज दत्ताजीराव पाटील
मदन बाबूराव देसाई
अमर पाटील
शासननियुक्त 4 संचालकांची यादी-
पन्हाळ्यातून शिवाजी आडनाईक
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे
केनवड्याचे कृष्णा पाटील
सांगली
तले अॅडव्होकेट प्रशांत पाटोळे
गोकुळ सत्तासंघर्षावर 9 नोव्हेंबरला कोर्टात काय काय घडलं? (Gokul President Election Court Hearing)
अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तीवाद-
अध्यक्ष निवडणूक जुन्या पद्धतीने व्हायला हवी सरकारचा आताचा निर्णय असा लागू करता येणार नाही.
सरकारच्या या आदेशाने यांनी ताकतीने majority तयार करण्याचा प्रयत्न केला
हा ordinance पास करण्याचे फक्त एक कारण आहे, self created परिस्थिती या ordinance साठी वापरली आणि या माध्यमातून सहकार क्षेत्र सोबत खेळण्यात आले
कोरम नसल्याचे कारण देण्यात आले फक्त हे एक कारण देण्यात आले.
1 तासापासून अभिषेक मनू सिंघवी सरकारचा अध्यादेश कसा चूक आहे हे मांडण्याचा प्रयत्न करत आहे...
यासाठी जुने वेगवेगळे दाखले, जुन्या केसेस, निकाल वाचून दाखवताय
तातडीने अध्यादेश आणि ते ही एक संस्थे साठी काढायची गरजच नव्हती - सिंघवी
सुप्रीम कोर्ट च्या अनेक निकालांचे वाचन सुरू आहे.
लोकशाही चा गळा दाबला जातोय - सिंघवी
सिंघवी यांनी दीड तास बाजू मांडली
वकील आशुतोष कुंभकोणी, दुसऱ्या याचिकाकर्त्यांचे वकील बाजू मांडत आहे.
त्या 4 नेमलेल्या संचालकांना वोट करण्याचा अधिकार देऊ नका- कुंभकोणी
25 निवडून आलेल्या सदस्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. अध्यक्ष निवडणूक या 25 सदस्यांच्या माध्यमातुन करण्यात यावी- कुंभकोणी
वकील मुकुल रोहतगी सरकारची बाजू मांडली-
अध्यक्ष निवडणूक होऊन जाऊ द्या , काही फरक पडणार नाही तो निर्णय युनिव्हर्सल नाही.- मुकुल रोहतगी
सरकारने काढलेला अध्यादेश कायदेशीर आहे लक्षात घ्या- मुकुल रोहतगी
अध्यादेश एक संस्थेसाठी नाही, ही निवडणूक त्याचा फक्त एक भाग आहे. अध्यादेश काढून संचालक नेमणे हा विषय महत्वाचा आहे.
महाराष्ट्र
शासनसाठी आम्ही कोट्यवधींची सबसिडी देतो त्यामुळे हा अध्यादेश intrest at of the state , intrest of the people of state साठी आहे. यासाठी हा अध्यादेश आहे. त्यामुळे this is not case for the stay...-मुकुल रोहतगी
25 सदस्य निवडून आले आहेत, 4 सरकारने नेमलेले आहेत ही मंडळी सर्वांच्या भल्याचा विचार करेल, आणि सरकारने नेमलेले लोक हवेत ना सरकारने दिलेल्या फंड्सचा योग्य उपयोग होतोय का पाहण्यासाठी, हे लक्षात घ्या- मुकुल रोहतगी
अभिषेक मनू सिंघवी म्हणतात कायदा बनवून दुरुपयोग केलाय, हे साफ साफ चूक आहे- मुकुल रोहतगी
राज्यसभेत नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकतात, मग सहकारी संस्था किंवा तत्सम संस्थांमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार का नसावा?- मुकुल रोहतगी
आमचे म्हणणे असे आहे की, सरकारी अध्यादेश किंवा कायद्यात काहीही चुकीचे नाही. ही याचिका फेटाळण्यात यावी.- मुकुल रोहतगी
सरकारी वकील मुकुल रोहतगींच्या युक्तिवादानंतर सिंघवी काय म्हणाले?
हा अध्यादेश गोकुळसाठी काढला आहे मान्य करा, शुक्रवारी अध्यादेश काढला मंगळवारी मीटिंग आहे म्हणून, हा अध्यादेश अजून कुठं वापरला हे ही आम्हाला सांगा- सिंघवी
कोर्टाने काय म्हटलं? (Gokul President Election 2026 Court Hearing)
10 नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार
निवडून आलेल्या 25 सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले 4 ही सदस्य मतदान करणार
शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांची मतदान केलेली मते वेगळे ठेवले जाणार
सर्व प्रक्रियेची व्हिडिओग्रफी केली जाणार
निकाल जाहीर केले जाणार, अध्यक्षही निवडला
राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळली
अध्यादेश बरोबर की चूक हे अद्याप ठरले नाही
पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार,
संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधिन
गोकुळ दूध संघ ताब्यात घेण्याचा कोणताही हेतू नाही- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Gokul)
राज्य सरकारचा गोकुळ दूध संघ ताब्यात घेण्याचा कोणताही हेतू नाही, ही केवळ एका जिल्ह्यापुरती संस्था असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. अध्यक्ष निवडीच्या वेळी एका गटाचे संचालक अनुपस्थित राहिल्यामुळे कोरम (quorum - किमान संख्याबळ) पूर्ण होऊ शकला नाही आणि वैधानिक पेच निर्माण झाला. हा पेच सोडवण्यासाठीच सरकारला हस्तक्षेप करावा लागला. जर दोन्ही गटांनी एकत्र बसून मार्ग काढला, तर सरकारला संचालक नेमण्याची गरज पडणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.

